भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; महिला जागीच ठार pudhari photo
जालना

भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; महिला जागीच ठार; हातडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

परतूर : भाचीला दुचाकीवर दवाखान्यात घेऊन जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टिप्पर ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेली भाचीचा हायवा अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना २५ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता घडली.

या प्रकरणी भिकाजी बोरकर यांनी परतूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची भाची वैष्णवी अभिमन्यू खेत्रे ( वय २१) (रा. सुलतानपूर, ता. गेवराई, जि. बीड) ही असून ती दोन महिन्यांपूर्वी मुलगा झाल्याने तिला माहेरी हातडी येथे आणले होते.

२५ सप्टेंबर रोजी भाची वैष्णवी खेत्रे हिचे आजारी असल्याने तिचा मुलगा लहान असल्याने त्यास घरी ठेवून दोघे दुचाकी (क्र. एमएच २१बीई ६०२८) वर हातडी येथून परतूरकडे येत असताना हातडी ते दैठणा रोडवर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी रोडवर पडली. भिकाजी बोरकर हे रोडच्या एका बाजूला पडले. तर भाची रोडच्या दुसऱ्या बाजूला पडल्यानंतर टिप्परचे टायर तिच्या डोक्यावरुन गेल्याने ती जागीच मरण पावली आहे.

टिप्परचालक घटनास्थळावरुन फरार

अपघातानंतर टिप्परचालक पळून गेला. गावातील नातेवाईकांनी भाची वैष्णवी अभिमन्यू खेत्रे मृतदेह उचलून परतूर ग्रामीण रुग्णालयात आणला. तेथे पोलिसांनी पंचनामा केला. डॉक्टरांनी भाची वैष्णवी हीचे शवविच्छेदन केले. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार अशोक गाढवे हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT