A new path of change in Rabi, there is an increase in the area under cultivation of Rajama beans
अविनाश घोगरे
घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात रब्बी हंगामात गहु, ज्वारी, हरभरा या पांरपारीक पिकासोबत आता राजमा या नवीन पिकाची लागवड शेतकरी करतांना दिसत आहे. यामुळे पारंपरिक पिकासोबत शेतकरी नवीन पिकाकडे वळतांना दिसत आहे.
घनसावंगी तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू आणि हरभरा ही पारंपरिक पिके प्रामुख्याने घेतली जातात. तालुक्यातील हवामान, मर्यादित पाणीपुरवठा आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेता अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मदार या पिकांवरच राहिलेली आहे.
मात्र, काळाच्या ओघात शेतीपध्दतीतही बदल घडू लागले असून आता शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच नव्या पिकांकडे वळताना दिसत आहेत. बदलत्या परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली असून, याचाच एक भाग म्हणून उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे राजम्याचे पीक आता घनसावंगी तालुक्यातही हळूहळू रुजू लागले आहे. यावर्षी काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर राजम्याची लागवड केली असून या पिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
राजमा हे पीक तुलनेने कमी कालावधीत येणारे, कमी पाण्यावर तग धरणारे तसेच बाजारात चांगला दर मिळवून देणारे आहे.
क्षेत्र वाढवणार 'दरवर्षी ज्वारी, गहू, हरभरा घेतो. मात्र या पिकात उत्पन्न कमी व खर्च वाढल्याने हातात काही उरत नव्हते. तिन वर्षा पासून राजम्याची लागवड केली. राजमा पिकाला पाणी कमी लागते, पीक छान तग धरून आहे. बाजारातही भाव समाधानकारक आहे. जर यंदाचे उत्पादन बऱ्यापैकी आले तर पुढच्या वर्षी राजम्याचे क्षेत्र वाढवायचा विचार आहे.-लक्ष्मण आनंदे, शेतकरी मासेगाव