परतूर येथील ज्ञानराधा मल्टीस्टेटची शाखा Pudhari Photo
जालना

ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन आणि बँक कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

परतूर, पुढारी वृत्तसेवा : येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह शाखा परतुर येथील मॅनेजर आणि कर्मचारी यांनी इतर बँकेपेक्षा ठेवीवर जास्त व्याजदर मिळत आहे. अशी माहिती बँकेचे मॅनेजर आणि कर्मचारी यांनी खातेदारांना देऊन शंभर ते सव्वाशे कोटी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी परतूर पोलिसात ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे,अर्चना कुटे सह बँक कर्मचारी यांच्यावर परतूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा बुधवारी (दि.24) दाखल करण्यात आला आहे.

भगवान श्रीरंगराव खंडागळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2018 मध्ये परतुर येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटीव्ह शाखा येथील मॅनेजर व कर्मचारी यांनी इतर बँकेपेक्षा ठेवीवर जास्त व्याजदर मिळत आहे. अशी माहीती दिली. विश्वास संपादन करुन पैशाची हमी घेतल्याने जीपीएफ व पेन्शनचे सगळी रक्कम ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह शाखा परतुर येथे गुंतवणुक करण्याचे ठरविले. आमच्या कुटूंबातील सुमारे 58 लाख 22 हजार 990 रुपयांची फसवणूक झाली आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉऑपरेटीव्ह ही बंद पडल्याची माहीती मिळाल्याने बँकेच्या परतुर येथील शाखेत गेलो असता तेथील मॅनेजर श्रीराम भाऊराव निर्मल, कर्मचारी नकुल कचरे यांनी कळविले की तुमचे पैसे लवकरच आरटीजीएस द्वारे तुम्हाला मिळतील असे सांगितले. त्यानंतर आम्ही वारंवार जिल्हा व्यवस्थापक रमेश जोगदंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पैसे लवकरच मिळतील असे सांगितले. तसेच सदर बँकेचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे, त्यांची पत्नी अर्चना सुरेश कुटे यांनी सोशल मिडीयाद्वारे व्हीडीओ प्रसारित करुन माहीती दिली की तुमचे पैसे लवकरच परत करणार आहोत. 5 मार्च 2024 रोजी परतूर शाखेने सर्वांना टोकन देऊन त्यावर रक्कम टाकुन सांगितले की, दि 21 मे 2024 रोजी तुमचे पैसे तुम्हाला मिळतील असे सांगितले. सदर टोकण आज रोजी आमच्या जवळ आहेत परंतु आम्हाला पैसे भेटले नाहीत. भगवान खंडागळे यांची 58 लाख 22 हजार 990 रुपयाची तसेच अनेक खातेदारांची 100 ते १२५ कोटी रुपयाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT