Jalna Crime News : ३२ वर्षीय तरुणाला सासरच्या व्यक्तींकडून बेदम मारहाण ! File Photo
जालना

Jalna Crime News : ३२ वर्षीय तरुणाला सासरच्या व्यक्तींकडून बेदम मारहाण !

चंदनझिरा परिसरात कौटुंबिक वादातून घडली घटना

पुढारी वृत्तसेवा

32-year-old youth brutally beaten by in-laws

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाटणी फार्म परिसरात कौटुंबिक वादातून एकाला सासरच्या व्यक्तींकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी संतोष विष्णु गायकवाड (३२ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. माळीपुरी कसबा जालना) यांचे लग्न सन २०१८ मध्ये चंदनझिरा येथील भगवान भुतेकर यांची मुलगी नंदा हिच्याशी झाले होते. फिर्यादी हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने, त्याने पत्नीसोबत तिच्या माहेरी राहण्यास नकार दिला होता.

याच कौटुंबिक वादातून त्यांची कोर्टात केस देखील सुरू आहे. बुधवार, दि. २० मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी संतोष गायकवाड हा त्याचा ठेकेदार संजू शिंदे याने बोलावल्यामुळे त्याच्या घरी गेला होता. आरोपी विजू सुपेकर याने "तू इकडे काय करतोस?" असे म्हणून काही कारण नसताना त्याला अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

याच दरम्यान आरोपी विष्णू माकोडे याने स्वतःच्या हातातील कोणीतरी जड वस्तू संतोषच्या डाव्या गालावर आणि डोळ्याजवळ जोरात मारून त्याला गंभीर जखमी केले. पोलीस ठाण्यातून मेडिकल मेमो घेऊन तात्काळ सरकारी दवाखाना, जालना येथे उपचारासाठी दाखल केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT