मराठवाडा

जालना: पुसद- मुंबई बसला अपघात; २३ प्रवाशी जखमी

अविनाश सुतार

मंठा, पुढारी वृत्तसेवा : पुसद- मुंबई बसला अपघात झाला. ही घटना केंधळी गावाजवळील नदी पुलावर मंगळवारी (दि.८) रात्री ८.३० च्या दरम्यान घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, पुसद – मुंबई बसच्या समोर असणाऱ्या टेम्पोचे टोचन तुटले. त्यामुळे टेम्पोचा वेग कमी झाल्याने बस (एमएच १३ सी ७५१२) टेम्पोला पाठीमागून धडकली. यात चालकाचा ताबा सुटल्याने बस १० ते १५ फूट खोल खड्यात पडली. बसने दोन पलट्या घेतल्या. बसमध्ये एकूण ४२ प्रवाशी होते. त्यातील २३ प्रवाशी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर मंठा येथील ग्रामीण रुग्णालय उपचार करण्यात आले. तर ७ प्रवाशांना जालना येथे पाठवण्यात आले. यावेळी अपघातग्रस्त बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. त्याला जालना येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णांना ग्रामीण रुग्णालय मंठा येथे दाखल केले आहे. तर ७ रुग्णांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT