मराठवाडा

जालना : श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या निषेधार्थ वारकऱ्यांची दिंडी

अविनाश सुतार

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेला ६ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही पोलिसांच्या तपासाला यश आलेले नाही. याच्या निषेधार्थ तालुक्यातील दैठणा येथील भाविकांनी मूर्ती चोरांचा तत्काळ शोध घेण्याच्या मागणीसाठी श्रीराम मंदिरापर्यत दिंडी काढली. यावेळी भाविकांच्या संतापाचा कडेलोट झालेला पाहायला मिळाला.

जांब समर्थ येथे समर्थ रामदास स्वामींच्या जन्म ठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिरातील हजारो वर्षापूर्वीच्या मूर्ती सोमवारी (दि.२२) पहाटे चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी सुमारे १५३५ मध्ये श्रीरामाच्या मूर्तींची स्थापना केली होती. पंचधातुमध्ये असलेल्या या मूर्ती आजही तेजस्वी दिसत होत्या. दरम्यान मंदिर बंद केल्यानंतर मंदिराच्या कुलपाची किल्ली एका ठराविक ठिकाणी ठेवली जाते. याचाच फायदा घेत चोरांनी राम-लक्ष्मण-सीता आणि पंचायतन असा वस्तू चोरट्यांनी पळवून नेल्या.

या घटनेनंतर घनसांवगीचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पाहणी केली होती. प्रथम चोरांनी किल्ली चोरून नेली आणि मूर्ती लंपास केल्या. यानंतर परत मंदिराला कुलूप लावून परत किल्ली आहे, त्या ठिकाणी ठेवली. या घटनेला ६ दिवस उलटूनही अद्य़ाप पोलिसांना चोरट्यांचा शोध घेता आलेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT