मराठवाडा

जालना: चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; १ गंभीर जखमी

अविनाश सुतार

अंबड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील पांगरखेडापासून जवळ असणाऱ्या राधारमन फॉर्महाऊसजवळ भरधाव बोलेरो पिकअपने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर नामदेव सावंत (वय 33, रा. बनगाव) याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले दीपक उत्तमराव कोळेकर हा गंभीर जखमी झाला. त्याला जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अंबड पोलिसांत शिवाजी विठ्ठल सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी (दि.31) रात्री 9 च्या सुमारास ज्ञानेश्वर सावंत अंबडहून आपल्या गावी बनगाव येथे मोटारसायकल (एम.एच.21 बी.डब्ल्यू 1024) वरून जात होता. यावेळी घनसावंगीकडे भरधाव जाणाऱ्या बोलेरो पिकअप ( एम.एच.20 ई. इल.9722) ने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला दीपक कोळेकर हा दूरवर दुचाकीला फरफटत गेल्याने गंभीर जखमी झाला.

तर घटनास्थळावरून 3 किमी अंतरावर ताडहादगाव जवळ असलेल्या मोबाईल टॉवरजवळ असणाऱ्या पाण्याच्या हौदाला धडकून बोलेरो पिकअप पलटी झाली. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT