मराठवाडा

जालना : बोंधलापुरी शिवारात महिलाचा मृतदेह आढळला

अविनाश सुतार

घनसावंगी: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बोंधलापुरी शिवारात ४० वर्षीय अनोळखी महिलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली. याबाबत घनसावंगी पोलीस ठाण्यात आकस्‍मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोंधलापुरी शिवारातील अंबड ते घनसांवगी जाणाऱ्या रोडवरील पुलाखालील पश्चिम बाजूस ओढ्यात एक अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती गावातील चक्रधर भानुदास धानोरे यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना येथील जिल्हा रुग्णालयात पाठवला. तपास पोलीस निरीक्षक पी. के. महाजन करीत आहेत. अद्यापपर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT