Maha IT Pudhari
हिंगोली

Hingoli News: महाआयटीलाही भ्रष्टाचारानं पोखरलं; एक लाख रुपयात आधार कार्ड नोंदणी केंद्र? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, चौकशीनंतर अनेक प्रकरणे उघडकीस येणार

पुढारी वृत्तसेवा

Youths cheated for Aadhar card registration center

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा

महाआयटीच्या वतीने बेरोजगार तरुणांना आधार कार्ड नोंदणी केंद्र चालवण्यासाठी दिले जातात. या केंद्रावर नागरिकांचे नव्याने आधार कार्ड तयार करणे, दुरुस्ती करणे आणि अपडेट करण्याचे काम केलं जाते. परंतु हेच आधार काई नोंदणी केंद्र तुम्हाला देती, असं म्हणून तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

दरम्यान बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याने व्याजाने पैसे काढून फसवणूकदाराला दिल्याने आता काही तरुणावर फाशी घेण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया फसवणूक झालेल्या तरुणांनी दिली. अशातच हे प्रकरण उजेडात आल्याने जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यांमध्ये महाआयटीचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा बांनी आधार कार्ड नोंदणी केंद्र मिळवून देतो, असे आश्वासन देऊन तरुणांकडून लाखो रुपये उकळण्याचा पकादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाभरामध्ये महा आवटीच्या बत्तीने वेगवेगळ्या खाजगी कंपनीच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना आधार कार्ड नोंदणी केंद्र दिले जातात. त्यासाठी अगोदर एक परीक्षा घेतली जाचे आणि त्या परीक्षेत पास झाल्यानंतर आधार कार्ड नोंदणी केंद्राचा ताबा या तरुणाकडे दिला जातो.

परंतु हे नोदणी केंद्र देण्यापूर्वी सागर भुतडा हे संबंधित बेरोजगार तरुणांकडे पैशाची मागणी करत असल्याचा आरोप तरूणांनी केला. तुला आधार कार्ड नोंदणी केंद्र मिळवून देतो, तू मला एक लाख रुपये दे, अशी ऑफर सागर भुतडा यांनी बालाजी कोंघे यांना दिली कामाची गरज असल्याने बालाजी यांनी या ऑफरला समर्थन दिले आणि जवळ पैसे नसल्याने व्याजानं पैसे घेऊन भुतडा यांना ५० हजार रुपये फोन पेद्वारे पाठवले. त्यानंतर वारंवार भुतडा यांनी सांगितलेल्या फोन पे नंबर वर बालाजी गांनी बेगवेगळी रकम पाठवली, अशी एकूण ९८ हजार रुपये रकम पाठवली.

त्यानंतर प्रत्येक महिन्याला २२०० रुपये शशवे लागतील, या अटीसह बालाजी यांना एक आधार कार्ड नोंदणी संच देण्यात आला. परंतु, आधार कार्ड नोंदणी संच चार महिने उलटूनही ऍक्टिव्हेट होत नसल्याने बालाजी थांनी ती आधार नोंदणी संच आँहा नागनाथ येथील महिला व चालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये सुपूर्द केला. त्यानंतर हा आधार कार्ड नोंदणी संच मिळवण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत, हे कळल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं बालाजी कोंघे यांच्या लक्षात आले. त्यावरून त्यांनी जिल्हाधिकायाकडे तक्रार देत याप्रकरणी महाआयटीचे जिल्‍हा समन्वयक भुतडा यांच्याकडून माझी फसवणूक झाली, असून त्‍यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

या प्रकरणाची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गंभीर दखल घेतली असून वा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एक चौकशी समिती गठीत करण्यात आली असून आठवडाभरामध्ये त्या समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

बेरोजगार राहण्यापेक्षा आपल्या हाती काहीतरी काम मिळते या अपेक्षेने अनेक बेरोजगार तरुण भुतडा यांच्या जाळ्यात अडकत जात आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करून सागर भुतडा यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा मला जिल्हाधिकारी कार्यालयात फाशी घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया बालाजी कोंघे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT