हिंगोली-नांदेड महामार्गावर ट्रकचा अपघात; चालकाचा मृत्‍यू  File Photo
हिंगोली

हिंगोली-नांदेड महामार्गावर ट्रकचा अपघात; चालकाचा मृत्‍यू

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्‍याने अपघात

पुढारी वृत्तसेवा

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा

कळमनुरी तालुक्यातील हिंगोली-नांदेड महामार्गावर भाटेगाव शिवारातील वळण रस्त्यावर दुपारी १२ वाजता अपघात घडला. या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला असून, अन्य एकजण गंभीर जखमी झाला. मृत व जखमी हे दोघेजण ट्रकच्या केबिनमध्ये चेपले गेले. त्यांना जेसीबीच्या साह्याने उचलून बाहेर काढले. जखमीला उपचारासाठी नांदेडकडे पाठविले आहे.

सदरील ट्रक क्रमांक जीजे ०४ एक्स ६४९७ हा नागपूरकडून हैदराबादकडे कोंबडी खाद्य घेऊन जात होता. दरम्‍यान आज (बुधवार) दुपारी बारा वाजता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे भाटेगाव येथील वळण रस्त्यावर अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन आडवा पडला. सदरील ट्रकच्या केबिनमध्ये दोन जण असल्याचे समजले. एक ट्रक चालक व एक प्रवासी हे दोघेजण ट्रक केबिनखाली चेपले गेले. यामध्ये एक चालक जागीच ठार झाला तर प्रवाशाला जेसिबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला रुग्णवाहिकेने नांदेडकडे पाठविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूरचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, जमादार नागोराव बाभळे महामार्गचे पोलीस निरीक्षक शेख उमर हे घटनास्थळी हजर होते.

सदरील अपघाताची माहिती स्थानिक पोलीसांनी १६१ महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना फोनवरून दिली. सदरील अपघातात दोघेजण केबीनखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मागणी केली. पण क्रेन येत नसल्याने पोलिसांनी भाटेगाव येथील जेसिबीच्या साह्याने केबीनखाली चेपलेल्या दोघाना बाहेर काढले. यापैकी एकाचा मृत्यू झाला. वेळेत मदत मिळाली असती तर एकाचे प्राण वाचले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT