Hingoli road accident pudhari photo
हिंगोली

Hingoli road accident : दोन अपघातांत तीन जण ठार

एक गंभीर जखमी; मृतांमध्ये दोन जिम ट्रेनरचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कारच्या अपघातात दोन जिम ट्रेनरचा मृत्यू झाला तर हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तिघांच्या मृतदेहावर हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली.

पुसद येथील परिमल राठोड व त्यांचा मित्र उदय गाजरे हे हिंगोली येथील एका जिममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करीत होते. गुरुवारी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास जीम बंद झाल्यानंतर परिमल त्यांचा मित्र उदय व अमोल कागणे हे त्यांच्या कारने पुसदकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यांची कार हिंगोली ते कळमनुरी मार्गावर शिवणी शिवारात आल्यानंतर एका वळणावर कारचा जोरदार अपघात झाला.

यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन कार दुभाजकावर जाऊन आदळली व रस्त्यावरच उलटली. या अपघातात कारचा चुराडा झाला. या अपघाताची माहिती मिळताच कळणनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जमीर नाईक, सहाय्यक पोलिस निरीक्षक पुणे, जमादार दिलीप पोले, गजानन कोठुळे, गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखणे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी कारमधील परिमल, उदय व अमोल यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तिघांची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर परिमल व उदय यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले.

या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या अमोल यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात मयत परिमल व उदय यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह कुटुंबाचा हवाली करण्यात आले. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. तर हा अपघात नेमके कसा झाला हे स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता

येथील शेख अफसर हे शुक्रवारी सकाळी मुख्य रस्त्याने जात असतांना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठे, उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार सुधीर ढेंबरे, अस्लम गारवे, किशोर पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत शेख अफसर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT