Crime news  File Photo
हिंगोली

Hingoli Crime News : लग्नासाठी नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी

परभणी जिल्ह्यातील तरुणावर पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Threat to circulate photos after refusal of marriage proposal.

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात अल्पवयीन मुलीस लग्नासाठी नकार दिल्यास छायाचित्र व्हायरल करून तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देणाऱ्या तट्टू जवळा (जि. परभणी) येथील एका तरुणावर शनिवारी सायंकाळी हट्टा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील मुलगी परभणी येथे शिक्षणासाठी राहत होती. यावेळी तद्रूजवळा येथील विक्रम कदम हा तरुण तिचा सतत पाठलाग करीत होता. मात्र त्या मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले. सन २०२१ पासून पासून तो पाठलाग करीत असतांनाही त्याच्या त्रासाकडे तिने दुर्लक्ष केले.

मात्र त्यानंतही विक्रम तिचा पाठलाग करीत होता. यावेळी त्याने तिचा हात धरून विनायभंग केला. या प्रकारामुळे मुलगी घाबरून गेली. सदर प्रकार घरी सांगितल्यास आपले शिक्षण बंद होईल याची भिती तीलस वाटत होती. त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

दरम्यान, सदर मुलगी नांदेड येथे गेली असतांना त्या ठिकाणीही तिचा पाठलाग करून एका ठिकाणी तिचे छायाचित्र काढले. त्यानंतर त्याने मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधून तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लाऊन द्या अन्यथा मुलीचे फोटो व्हायरल करून तिचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली. तसेच मोबाईलवर मेसेज पाठविला.

या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी मुलीला सोबत घेऊन हट्टा पोलिस ठाणे गाठत विक्रम कदम याच्याविरुध्द तक्रार दिली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक युवराज गवळी पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT