File Photo
हिंगोली

कलमनुरी येथे चोरट्यांनी दोन ज्वेलर्स दुकाने फोडली

चांदीसह रोख रक्कम पळवली

पुढारी वृत्तसेवा

कलमनुरी : शहरातील बाजार पेठेच्या मुख्य मार्गावरील ज्वेलर्सची दोन दुकाने फोडून 11 तोळे चांदीसह रोख 10 हजार रक्कम चोरट्यांनी पळवली. ही घटना शनिवारी (दि.8) घडली.

या बाबत माहिती अशी की, शहरातील पोस्ट ऑफिस ते जुने पोलीस स्टेशन या बाजार पेठेच्या मुख्य मार्गावर शेख आवेस शेख चांद यांचे मदिना ज्वेलर्स तर शेख खाजा शेख उस्मान यांचे मक्का ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. 8 फेब्रुवारीला रात्री 2 वाजताच्या दरम्यान 5 चोरट्यांनी ही दोन्ही दुकाने फोडली. यामध्ये 11 तोळे चांदीसह 10 हजार रोख रक्कम चोरट्यांनी पळवली. याप्रकरणी शेख आवेस शेख चांद यांनी कलमनुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT