दांडेगावकरांसाठी रोहित पवार-रोहित पाटील मैदानात  pudhari photo
हिंगोली

Wasmat Assembly Election : दांडेगावकरांसाठी पवार-पाटील मैदानात

पुढारी वृत्तसेवा

वसमत, पुढारी वृत्तसेवा : वसमत विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार राजू पाटील नवघरे विरुद्ध माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यात लढत होण्याचे आता स्पष्ट झाले असून दांडेगावकरांच्या विजयासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी विशेष लक्ष घातले असून शुक्रवारी वसमत येथे आमदार रोहित पवार व युवा नेते रोहित पाटील यांचा युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून युवकांना दांडेगावकरांच्या पाठीशी उभे करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात संकल्प विजयाचा, निर्धार युवकांचा या थिमखाली युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार, युवा नेते रोहीत आर. आर. पाटील हे संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

मागील महिन्याभरापासून आमदार राजू पाटील नवघरे व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. गावभेटीदरम्यान दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर तोंडसुख घेतले जात आहे. आ. नवघरे यांच्या पराभवासाठी दांडेगावकर यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदार संघातील युवा मतदार दांडेगावकरांच्या पाठीशी उभे रहावेत यासाठी आमदार रोहित पवार व रोहित पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT