आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील साळवा नरवाडी शिवारामध्ये अज्ञात दोन इसमानी बालाजी रामजी कराळे (रा, पर्जना तालुका वसमत ) यांच्या जवळील पाच हजार रुपये नगदी व पाच ग्राम सोन्याची अंगठी असे मिळून एकूण ४२ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञान आरोपीने घेऊन पळ काढला. ही घटना ९ मार्च २०२५ रोजी दुपारी घडली असून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
बाळापूर पोलीस ठाण्यातील साळवा, नरवाडी शिवारात पंजाबराव मखाने यांच्या शेताजवळ अज्ञात दोघेजण हे बालाजी कराळे यांना भेटले. यानंतर आम्ही पोलीस आहोत असे सांगून इकडे खून झालेला आहे, तुम्ही इकडे कसे काय फिरता?, आम्हाला चेक करायचे आहे, तुमच्याकडे काय आहे ते काढून द्या, असे म्हणाले. यानंतर फिर्यादीने त्याच्याजवळ असलेले पाच हजार रुपये व पाच ग्राम सोन्याची अंगठी काढून दिली.
नंतर सदरचा मुद्देमाल घेऊन ते दोघेजण पळून गेल्याने फिर्यादीची फसवणूक झाल्याचे समजले. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला, घटनास्थळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठे, स,पो,नि, ज्ञानेश्वर बसवंते, जमादार शिवाजी पवार, यांनी भेट दिली असून पुढील तपास आर. एस. घोंगडे करीत आहे,