कळमनुरी : तालुक्यातील गौळ बाजार परिसरातील गेल्या दोन-तीन महिन्यापासून ऊस लागवणीच्या तारखा संपूनही आजपर्यंत शिउर साखर कारखाना वाकोडी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड केलेली नाही. यामुळे साखर कारखान्याने तात्काळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड करावी अन्यथा गौळ बाजार परिसरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला होता. याची कारखाना प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेंबाळपिंपरी माळेगाव रस्त्यावरील गौळ बाजार येथे तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केले.
कारखाना प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. दि.४ जानेवारी रोजी ऊस तोडणी करणारे हार्वेस्टिंग मशीन व 5 दिवसात चार ऊस तोडणी करणारे मजूर पुरविण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले.
यावेळी गौळ बाजार येथील ऊस उत्पादक शेतकरी सरपंच रुपेश सोनी, मारोतराव कदम,मंचक राव इंगळे,शिवम मुधळ, गजानन ठेंगे, ज्ञानेश्वर कदम, दिलीपराव कदम ,रामजी पतंगे, दौलतराव अंभोरे,आनंदराव चंद्रवंशी,पंजाब महाराज, संतोष बोरकर, नितीन सोनी, डॉक्टर पांडुरंग पावडे,सुनिल छाजेड, राहुल सावंत, सुनील कदम, सुरेश सोनी, किसन देशमुख, प्रभाकर कदम, प्रताप कदम, अमोल कदम,किसन इंगळे, आशिष कदम, रमेश कदम, दिगंबर पावडे, दिलीप नरहरी,शिवाजी शिंदे, पांडुरंग शिंदे, दीपक सूर्यवंशी, देवानंद कदम, अजबराव पाईकराव, विजय मस्के, दत्ता लष्कर, बालासाहेब सूर्यवंशी, सचिन नावडे,अविनाश मास अश्विन कदम, बालाजी कदम यांच्यासह शेकडो ऊस उत्पादक शेतकरी रास्ता रोको आंदोलनात उतरले होते. यावेळी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.