हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून राहुल गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
हिंगोली

राहुल गुप्ता हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी

Hingoli News : उद्या जिल्हाधिकारीपदाची सुत्रे हातात घेणार

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील वीज कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी (दि.१५) काढले आहेत.

हिंगोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची सात महिन्यातच बदली झाल्यानंतर नवीन जिल्हाधिकारी कोण येणार? याची उत्सुकता नागरिकांना लागली होती. जिल्हाधिकारी गोयल यांनी सात महिन्यातच जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले होते. याशिवाय शिक्षण, आरोग्य क्षेत्रातही मोठे काम केले. त्यांच्या बदलीमुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत होता. दरम्यान, गोयल यांची बदली झाल्यानंतर नवीन जिल्हाधिकारी कोण येणार? याची उत्सुकता नागरिकांना लागली होती. त्यानंतर मंगळवारी नुतन जिल्हाधिकारी म्हणून वीज कंपनीचे छत्रपती संभाजीनगर येथील सह व्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी गुप्ता हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून सन २०१७ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळविले आहे.

त्यानंतर त्यांनी गडचिरोली जिल्हयातील अहेरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले असून त्यानंतर धाराशिव जिल्हा परिषदेचे तीन वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते वीज कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक आहेत. आता त्यांची हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून ही जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी पहिल्यांदाच पदभार स्वीकारला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाणी प्रश्नासोबत आरोग्य सेवा बळकट करणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे यासह विकासकामांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. जिल्हाधिकारी गुप्ता हे बुधवारी पदभार स्वीकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT