उन्हाळ्यात थंड पाण्याच्या पाणपोई आठवणीतच राहणार  pudhari photo
हिंगोली

Hingoli News : उन्हाळ्यात थंड पाण्याच्या पाणपोई आठवणीतच राहणार

ठिकठिकाणी होतोय जारचा वापर,

पुढारी वृत्तसेवा

अनिल पोरवाल

जवळा बाजार ः उन्हाळ्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची वाढ होण्यास सुरुवात होते आणि बस स्थानक , चौका चौकात , ठिकठिकाणी थंड पाण्यासाठी सार्वजनिक पाणपोई पहावयास मिळत होते पण आता ठीक ठिकाणी पाणपोईची जागाही पाणी जारने घेतल्याने थंड पाण्याची पाणपोई हद्दपार झालेली पहावयास मिळत आहे.

उन्हाळ्यात तहानलेल्या तहान भागविण्यासाठी सामाजिक कार्यात सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती लोकप्रतिनिधी स्वखर्चाने पाणपोई सुरू करत करतात परंतु अलीकडच्या काळामध्ये पाण्याचा व्यापार सुरू झाल्याने पाणपोई जार व बॉटल बाटलीबंद पाण्यामुळे हद्दपार झाला आहे. जार व बॉटल बंद पाण्याचा जमान्यात पाणपोई तुरळक प्रमाणात पहावयास मिळत आहेत. खंत व्यक्त केली जात आहे. तहानलेल्या पाण्याची सुविधा करणे ही आपली संस्कृती आहे.

त्यामुळे पूर्वीच्या काळात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्था संघटना सामाजिक सेवेचा भान जपत वाट सरूना प्यायचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी बस स्थानक रेल्वे स्टेशन शासकीय कार्यालय विविध चौकात आठवडी बाजारात आदी ठिकाणी पाणपोई उभारली जाते. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या कष्टकरी यांना माठातील थंड पाण्याची चांगली सोयी सुविधा उपलब्ध होत होती विशेषता उन्हाळ्यात यावर भर दिला जात असे कारण जेव्हा जारच्या प्लांट बाटलीबंद पाण्याचा व्यापार याचा फारसा विस्तार झाला नव्हता अलीकडे मात्र जारच्या पाण्यातून पाणी विकत सवलतीच्या दरात मिळू लागल्याने पाणपोई पद्धत मागे पडू लागली तर पाणपोई पाणी मिळणे किंवा पिणे आता कमीपणा वाटू लागलेला आहे.

एवढेच काय तो हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी विकत घेऊन पिण्याची संख्या जास्त वाढ झालेली पाहावयासत मिळत आहे परंतु ज्यांना बाटलीबंद पाणी विकत घेणे शक्य नाही अशा सामान्य उन्हाळ्यात हाल होत आहेत त्यामुळे विविध मंडळी दानशूर व्यक्ती सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेऊन पाणपोई पुन्हा सुरू करून तहानलेला पाणी उपलब्ध करून देण्याची काळाची गरज आहे. पूर्वीच्या काळी घराबाहेर पडल्यानंतर कुठे रांजण माठ त्यावर लाकडी छाकणी आणि लाल रंगाचा ओला कपडा झाकलेला पाणी पिण्यासाठी रंगबेरंगी प्लास्टिकचे ग्लास अशी पाणपोई असायची त्या मध्ये नैसर्गिक पद्धतीने थंड झालेल्या पाणी तहान भागवायची परंतु कालांतराने पाणपोई थंड पाण्याच्या जागा थंड पाणीचा जार ने घेतली.

जार मुळे मातीच्या माठाचा वापर कमी प्रमाणात होण्यास सुरुवात झालेली आहे लग्न समारंभ वाढदिवस विविध धार्मिक कार्य सामाजिक कार्यक्रम सभा ठिकाणी पाण्याचे जार मागविले जात आहे. उन्हाळा सुरू झाला की मागणीत प्रचंड वाढ होते मोफत पाणी उपयुक्त करून देण्याचा हेतू चांगला असला तरी बदलत्या काळात नागरिक असे पाणी पिण्यास टाळतात भले पैसे मोजावे लागले तरी चालेल पण जार व बंद पाणी बॉटल यांना महत्त्व मोठ्याप्रमाणात आले आहे घराघरात देखील आता हेच पाणी मागविले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

  • एकंदरीत मुख्य चौक बसस्थानक आदी ठिकाणी थंड पाणी म्हणून पाणपोई सर्वसामान्यांना आठवण नक्कीच उन्हाळ्यातील तीव्रते मध्ये फिरत असताना अचानक तहान लागल्यानंतर पाणपोईचा शोध घेणे आता हद्दपार झाले आहे बाटलीबंद पाणी जार याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने होत आहे ठिकठिकाणी दुकानामध्ये ग्राहकास पाणी जार माध्यमातून देण्यात येत आहेत त्या मुळेच उन्हाळ्यात थंड पाणी पाणपोई आठवणीतच रहाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT