Police take action against those who put fake MLA logo on their car
कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा :
आमदारकीचे लोगो गाडीवर लाऊन शहरात मिजास मिरवणाऱ्या कथाकथीत पुढाऱ्याच्या वाहनावरील लोगो पोलीस प्रशासनाने काढून कारवाई केली.
शहरात अनेक कार्यकर्ते व स्वयंघोषित नेते आपण आमदाराच्या जवळचे आहे असे भासवण्यासाठी तसेच आपला बडेजावपणा व मिजास मिरवण्यासाठी आपल्या वाहनावर चक्क आमदार विधानसभा असा लोगोचा वापर करीत जनसामान्यांमध्ये आपली दहशत दाखवत होते.
विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत पक्षाचे काम तर सोडा उलट पक्षविरोधी काम ही केले. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांत चीड निर्माण झाली. शहरात असे अनेक कार्यकर्ते आमदार यांच्या नावाचा गैरवापर करीत नागरिकांमध्ये व प्रशासनास पण दरडावण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार पोलीस प्रशासनास करीत अशा वाहनावर कार्यवाहीची मागणी आर. आर. पाटील यांनी केली असता पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी तत्काळ पोलीस पथकास शहरातील अशा वाहनांचा शोध घेत लोगो काढण्याचा सूचना दिल्या.
विट जमादार रवि इंगोले यांनी संजय आघाव यांच्या वाहनावर लोगो आढळून आला. याबाबत त्यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने लोगो काढण्यात आला. या घटनेमुळे अनधिकृत लोगो वापरणाऱ्या नेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.