Hingoli News : बसमध्ये डिझेल भरताना आगारात नोजलचा स्फोट File Photo
हिंगोली

Hingoli News : बसमध्ये डिझेल भरताना आगारात नोजलचा स्फोट

महिला कर्मचारी भाजल्याने गंभीर इजा, सुरक्षेचा बोजवारा

पुढारी वृत्तसेवा

Nozzle explodes at depot while filling diesel into bus

वसमत, पुढारी वृत्तसेवा : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात डिझेल पंपावर बसमध्ये डिझेल भरताना अचानक नोजलचा स्फोट झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.२० वाजेच्या दरम्यान घडली. यात महिला कर्मचारी ज्योती काळे वय ३७ वर्ष गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले.

येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगारात गुरुवारी एका बसमध्ये डिझेल भरत असताना डिझेल पंपाच्या नोजलमध्ये बिघाड होऊन त्याचा स्फोट झाला. यात ज्योती काळे यांच्या अंगावर डिझेल पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने एका बसमध्ये टाकून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे दाखल या घटनेनंतर करण्यात आले.

आगारातील सुरक्षेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. डिझेल पंपाची अवस्था अत्यंत दयनीय असून पंपाच्या नोजलला जाळे लागलेले स्पष्टपणे दिसत आहे. त्याचबरोबर बाजूला असलेल्या विजेच्या तारा चिकट टेप लावून जोडलेल्या अवस्थेत आहेत. वाहनांना इंधन पुरवठा करणाऱ्या या पंपावर सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याची चर्चाचालक व कर्मचारी वर्गात चर्चा सुरू आहे. या प्रकरणी अधिक माहिती घेण्यासाठी आगारप्रमुखांशी संपर्क केला असता त्यांनी फोन घेतला नाही. अन्य कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता ते सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT