भूकंपाचा धक्का  File Photo
हिंगोली

Earthquake Hingoli | हिंगोली जिल्ह्यात सौम्य भूकंपाचा धक्का

वसमत तालुक्यातील खापरखेडा परिसरात पहाटे ४.५८ वाजता जाणवले धक्के; भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल

पुढारी वृत्तसेवा

Basmath Mild Earthquake

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या खापरखेडा परिसरात आज पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी भूगर्भातून आवाजासह सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता भूकंपमापक केंद्रावर २.९ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

या धक्क्यामुळे परिसरात काही काळ चर्चा सुरू झाली. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने स्पष्ट केले आहे.

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह संबंधित सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी जावे. इमारती, विद्युत खांब आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी केले आहे.

भूकंपाबाबत सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती मिळाल्यास तिची खात्री अधिकृत शासकीय माध्यमांद्वारे करावी. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT