मूल होत नाही म्हणून विवाहितेचा छळ File Photo
हिंगोली

मूल होत नाही म्हणून विवाहितेचा छळ

विवाहानंतर मुल होत नसल्याच्या कारणावरून तसेच माहेरून एक लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

पुढारी वृत्तसेवा

Married woman harassed for not having children

औंढा नागनाथ : पुढारी वृत्तसेवा

विवाहानंतर मुल होत नसल्याच्या कारणावरून तसेच माहेरून एक लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या जालना जिल्ह्यातील दुधा येथील सासरच्या पाच जणांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मनिषा पैसे आणू शकल्या नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या सासरच्या मंडळींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. हा त्रास असह्य झाल्याने मनिषा मागील काही दिवसांपासून माहेरी आल्या होत्या. अखेर त्यांनी हिंमत करून सोमवारी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी पती आकाश घोळे, उकंडी घोळे विष्णू घोळे, संगीता घोळे आणि लक्ष्मी घोळे (सर्व रा. दुधा, ता. मंठा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पैशासाठी जाच आणि धमक्या

औंढ्यातील लहुजी नगर येथील रहिवासी असलेल्या मनिषा यांचा विवाह जालना जिल्ह्यातील दुधा येथील आकाश घोळे याच्याशी झाला होता. संसाराचे सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली. मुल होत नाही या कारणावरून मनिषा यांना सतत टोमणे मारून मारहाण करण्यात येत होती. इतक्यावरच न थांबता, माहेरून १ लाख रुपये घेऊन येण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT