सेनगाव : सेनगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मनीषाताई देशमुख यांची तर उपनगराध्यक्षपदी शालिनीताई देशमुख यांची निवड करण्यात आली.
सेनगाव नगरपंचायतीमध्ये एकूण १७ नगरसेवक आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ५, शिवसेना ठाकरे गटाचे ५, भाजपा ५ आणि काँग्रेसचे दोन आहेत. त्यामुळे इथली सत्ता गेल्या तीन वर्षांपासून महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. पहिल्या अडीच वर्षातील सव्वा वर्षासाठी शिवसेना ठाकरे गटाकडे नगराध्यक्ष पद तर उपनगराध्यक्ष पद राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे होते. तर दुसरे सव्वा वर्षे राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष तर उपनगराध्यक्ष सेनेकडे होते. त्यामुळे यावेळी ठरल्याप्रमाणे पाहिले सव्वा वर्ष राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष पद आणि उपनगराध्यक्ष सेनेकडे पाहिजे होते. मात्र भाजपकडून स्वांजली अप्पासाहेब देशमुख यांनी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला होता त्यांना ७ तर राष्ट्रवादीचे मनीषा देशमुख यांना १० मते मिळाली तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे अमोल तिडके यांना ७ तर राष्ट्रवादीचे शालिनीताई देशमुख यांना १० मते मिळाली.
भाजपने महविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सावधगिरी बाळगून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद हे राष्ट्रवादीकडेच देण्यात आले. त्यामुळे भाजपाच्या विद्यमान आमदारांनी सेनगाव नगरंचायतवर सत्ता स्थापन करण्यासाठी टाकलेला डाव महविकास आघाडीने उधळून लावल्याचे चित्र पहायला मिळाले.