Maggots and insects are being found in the food; bathing with cold water in the biting cold
कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू आहे.
निकृष्ट दर्जाचे जेवण, अस्वच्छ पाणी आणि बंद पडलेले गिझर यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वरिष्ठांचे आणि गृहपालाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनी या अनागोंदी कारभाराची तक्रार वंचित बहुजन आघाडीकडे केल्यानंतर, तालुकाध्यक्ष राजू कांबळे आणि पदाधिकाऱ्यांनी रविवारी वसतिगृहाला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी सर्व गैरप्रकार उघडकीस आले.
निकृष्ट दर्जाचे जेवण, अस्वच्छ पाणी आणि बंद पडलेले गिझर यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वरिष्ठांचे आणि गृहपालाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनी या अनागोंदी कारभाराची तक्रार वंचित बहुजन आघाडीकडे केल्यानंतर, तालुकाध्यक्ष राजू कांबळे आणि पदाधिकाऱ्यांनी रविवारी वसतिगृहाला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी सर्व गैरप्रकार उघडकीस आले. वंचितने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर समाज कल्याण विभागाचे अधिकारी अमोल घुगे यांनी तातडीने वसतिगृहात धाव घेतली.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लवकरच सोयी-सुविधा देण्याचे आश्वासन दिले. गिझर बंद, टाक्यांमध्ये गाळ वसतिगृहाची क्षमता १०० असून सध्या ५० विद्यार्थी येथे वास्तव्यास आहेत. वसतिगृहातील २५ ते ३० खोल्यांपैकी केवळ ३ खोल्यांमध्ये पाणीपुरवठा होतो. इमारतीच्या छतावरील पाण्याच्या टाक्या मागील अनेक महिन्यांपासून साफ केलेल्या नाहीत, त्यामुळे नळाला अत्यंत घाण पाणी येते. तसेच, गरम पाण्यासाठी बसवलेले गिझर बंद पडल्याने या कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नाईलाजाने थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. स्वच्छतागृहांची अवस्थाही बिकट असून महिन्यातून एकदाच साफसफाई होत असल्याचा आरोप आहे.
भातात अळ्या, वरणामध्ये किडे
येथील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अनेकदा भातात अळ्या आणि वरणामध्ये किडे आढळून आले आहेत, तर पोळ्याही कच्च्या असतात. याबाबत कंत्राटदाराकडे तक्रार केली असता, "तुम्ही जेवण कमी खा, म्हणजे चांगले जेवण देता येईल," अशी उर्मट उत्तरे दिली जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.