हरवलेली पर्स पोलिस ठाण्यात केली जमा  pudhari photo
हिंगोली

Hingoli News : हरवलेली पर्स पोलिस ठाण्यात केली जमा

पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांनी इसमाचा सत्कार करीत त्यांचा प्रामाणिकपणाचे कौतुक केले

पुढारी वृत्तसेवा

कळमनुरी : हरवलेली पर्स मिळाली असता इसमाने प्रामाणिकपणे ती पर्स पोलीस स्टेशनमध्ये जमा केली. प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांनी इसमाचा सत्कार करीत त्यांचा प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

10 फेब्रुवारी रोजी सकाळी शहरातील आठवडी बाजारातील महिला जयश्री गायकवाड जुने बसस्थानक परिसरात कामानिमित्त गेल्या असता त्यांची पर्स गहाळ झाली. या पर्समध्ये रोख रक्कम, एटीएम कार्ड व दागिने अशा मौल्यवान वस्तू होत्या. सदर पर्स गहाळ झाल्यामुळे सदर महिला हवालदिल झाली होती.

या दरम्यान सदर पर्स शहरात कामानिमित्त आलेल्या रामवाडी येथील युवक कृष्णा रामजी मोरे या युवकास सापडली असता पर्समधील कोणत्याही वस्तूला हात न लावता त्यांनी पर्सच्या वारसाचा शोध घेतला तसेच सदर पर्स मूळ मालकास मिळावी या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ता कांता पाटील यांच्याशी संपर्क साधत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीसांच्या स्वाधिन केली. सदर पर्स पोलीस प्रशासनाने खातर जमा करीत जयश्री गायकवाड यांच्या हवाली केली.

बारावी परीक्षेच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक निलभ रोहन कळमनुरी दौऱ्यावर आले असताना ही बाब त्यांना माहित झाल्यानंतर त्यांनी कृष्णा मोरे यांचे कौतुक करीत त्यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस उपाधिक्षक कुंदनकुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे यांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT