Shivsena Protest on MP Nagesh Patil Ashtikar Pudhari
हिंगोली

MP Nagesh Patil Ashtikar | हिंगोलीचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

Shivsena Protest on MP Nagesh Patil Ashtikar

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे शुक्रवारी (दि.१९) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला.

ठाकरे सेनेच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर पक्षाशी गद्दारी करत दुसऱ्या गटात प्रवेश केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शेतकरी जिल्हाध्यक्ष पराग आडकिने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खासदारांविरोधात संताप व्यक्त केला.

खासदारांच्या भूमिकेमुळे हिंगोली जिल्ह्यातील मतदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. पक्षनिष्ठेला तिलांजली देणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनतेसमोर उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ डोंगरकडा परिसरातील राजकीय वातावरण तापले होते. पोलिस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT