कळमनुरी : शहर व कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत अवैध धंद्याविरुद्ध पोलिस निरीक्षक जमीर नाईक यांच्या धडक कार्यवाहीचे सत्र सुरू असून या मोहीम अंतर्गत १६ जून रोजी सायंकाळी ग्रामीण भागात अवैध दारू विक्री करीत असताना धाड टाकत ५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका जणाविरुद्ध कारवाई करण्यात आली.
कळमनुरी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक जमीर नाईक यांनी पदभार घेतल्यापासून अवैध धंद्याविरुद्ध कडक मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेदरम्यान १६ जून रोजी सायंकाळी गिराम वाडी सांडस रोडवर पाळोदी शिवारात इसम अवैधरीत्या देशी व विदेशी दारू विक्री करीत असल्याच्या माहितीवरून कळमनुरी पोलिसांनी धाड टाकली असता या धाडीत आरोपी अमोल कोरडे यास ताब्यात घेत त्याच्याजवळ विक्रीसाठी असलेल्या देशी विदेशी दारू बॉटल त्याची किंमत ५ हजार २२९ रुपये जप्त करण्यात आली.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक जमीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी किशोर खिलारे, दिलीप पोले, विलास बांगर, शिवाजी कपाटे यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.