कळमनुरीत अवैध मटका जुगारावर पोलिसांचा छापा  File Photo
हिंगोली

Illegal Gambling Case : कळमनुरीत अवैध मटका जुगारावर पोलिसांचा छापा

22 हजारांचा मुद्देमाल जप्त, पोलिस ॲक्शन मोडवर

पुढारी वृत्तसेवा

कळमनुरी ः शहरात सुरू असलेल्या अवैध मटका जुगारावर पोलिसांनी मोठी कारवाई करत 22 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ निलभ रोहन यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधिक्षक निलभ रोहन यांच्या सूचनेनुसार विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचारी एस.एम.पवार, सुमीत टाले यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली.

शहरातील एका ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन राजेश्री ऑनलाईन मटका जुगाराचे आकडे संगणकावर प्रिंट करून दिले जात होते. त्यानुसार पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी 5.20 वाजता छापा मारला असता, एका इसमाकडून मटका जुगार चालवित असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत आरोपींकडून 6 हजार 300 रुपये रोख रक्कम, एक संगणक संच व प्रिंटर असा एकूण 22 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संबंधित आरोपीविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस जमादार रवी इंगोले करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ निलभ रोहन अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली व संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

  • जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, अवैध दारू, मटका, जुगार तसेच अन्य बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT