शहागड प्रतिनिधी : अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे एका बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने निकालाचे टेन्शन घेऊन जीवन संपवले. या घटनेची नोंद गोंदी पोलिस ठाण्यात झाली आहे. याची फिर्याद मुलीचे वडील राजेंद्र उर्फ राजु साहेबराव शिंदे यांनी दिले आहे. किर्ती राजेंद्र उर्फ राजु शिंदे वय 18 असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. तिने राहत्या घरी गळफास घेतला.
याबाबत अधिक माहिती अशी की किर्ती हिने नुकतीच बारावीचही परीक्षा दिली आहे. पेपर अवघड गेल्याने निकाल काय लागणार याचा माणसिक ताण आल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. याची नोंद गोंदी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर पुढील तपास करीत आहेत.
किर्ती ही छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती. किर्ती ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. परंतू यावेळीची बारावी बोर्डाची परीक्षाचे पेपर अवघड गेले होते. शेवटचा समाजशास्त्रचा पेपर झाल्यानतंर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. यामुळे वर्ग मैत्रिणीमध्ये हळ-हळ व्यक्त करणे येत आहे.