file photo  
हिंगोली

Hingoli Crime : घरगुती वाद विकोपाला; पत्नीचा दोरीने गळा आवळून खून

दिनेश चोरगे

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : घरगुती वाद विकोपाला गेल्याने पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यात उघडकीस आली आहे. ही घटना तालुक्यातील सावंगी शिवारात आज (दि. ३) सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. शिवानी गांगलवाड (वय २३ ) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. घटनेनंतर काही वेळातच आरोपी स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाला व त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

नांदेड येथील वसंतनगर भागात राहणारा किरण उत्तम गांगलवाड याने औंढा नागनाथ तालुक्यातील सावंगी येथे शेतजमीन घेतली होती. काही दिवसांपूर्वी तो त्याची पत्नी शिवानी गांगलवाड हिला घेऊन येथील शेतात राहण्यास आला होता. परंतु, पत्नी शिवानी त्याच्यासोबत शेतात राहण्यास तयार नव्हती. त्यामुळे ती परत माहेरी सोडण्याच्या कारणावरून पतीशी भांडत असल्याची माहिती आरोपीने दिली. याच कारणावरून शुक्रवारी (दि.३) सकाळी दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात किरणने याने पत्नी शिवानीला हिला मारहाण करून दोरीने गळा आवळून तिचा खून केला. व  हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून केलेल्या कृत्याची पोलीस अधीक्षकांसमोर कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक जीएस राहिरे, यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, बिट जमादार संदीप टाक, गजानन गिरी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. व त्यानंतर शिवानीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंढा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीएस राहिरे करत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT