Wasmat Taluka Wild Animals Crop Damage
हिंगोली: हट्टा (ता. वसमत) शिवारात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा सुळसुळाट वाढला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी रानडुक्कर, हरिण व अन्य वन्य प्राणी शेतात घुसून उभी पिके तुडवून नष्ट करत आहेत.
या भागात ज्वारी, कापूस, तूर व गहू भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सततच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शासनाकडून वन विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.