अस्मिता जाधव Pudhari
हिंगोली

Hingoli Girl Drowns | नदीत कपडे धुताना तरुणीचा रेतीच्या खड्ड्यात पडून मृत्यू

वसमत तालुक्यातील हट्टा जवळील सोन्ना येथील नदीपात्रात घटना

पुढारी वृत्तसेवा

Vasmat Girl Drowns In Sand Pit

हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा जवळील सोन्ना येथील अस्मिता गजानन जाधव (वय 17 ) या युवतीचा नदीपात्रातील रेती उपशामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि.२७) सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अस्मिता ही शिक्षणासाठी मामाच्या गावी राहत होती. शाळेला सुट्ट्या लागल्याने ती आपल्या गावी सोन्ना येथे आली होती. आज सकाळी गावाजवळील नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेली असता, रेती उपशामुळे तयार झालेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडाली.

स्थानिक नागरिकांनी शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला असून डॉ. सिद्दिकी यांनी शवविच्छेदन केले.

दरम्यान, नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अवैध रेती उपशामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT