वसमतनगर: तालूक्यातील रेऊलगाव शिवरात शॉटसर्किटमुळे ता १० अक्टोबर रोजी दुपारी १ वाजे दरम्यान सलग ७ एकर ऊस जळाला असल्याची घटना घडली आहे. यात,शेतकरी पंजाब गणपती फेगडे यांचा ४ एकर, रामराव शेषराव फेगडे २ एकर, ज्ञानेश्वर महादजी फेगडे १ असा मिळून ७ एकर ऊस जळाला आहे. यात संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे १२ लाख रुपये आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच अतिवृष्टीत पिचलेले सदर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात येवून हवालदील झाले आहेत.
दरम्यान, या तिन्ही शेतकऱ्यांच्या शेतजमीन गट क्रमांक २४३ मधून महावितरणच्या विद्यूत तारा ह्या जुन्या झाअसून त्या लोंबकळल्या गेल्यात.परिणामी, अचानक विद्यूतवहन चालू असताना दुपारी तारात शाटशर्किट होवून ज्वालीची ठिणगी उडून तोडणी रिक्वहरीला आलेला सात एकर ऊस जळाला.सदर जीर्ण व लोंबकळलेल्या तारा महावितरण विभागाने ओढून घेतल्या असत्या तर हा अनर्थ टळला असता. आठवड्यातील ही घटना दुसरी घटना असून यामध्ये महावितरण चा अनागोदी कारभार दिसून येत आहे.
दरम्यान दुसराही बळीचा बकरा महावितरणे बनवला आहे, सध्या कोणत्याही साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालू नसल्यामुळे जळालेला ऊस वाळून जळावू जळतन होणार असल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही. जर साखर कारखाने चालू असते तर जळावू ऊस तात्काळ गाळपासाठी नेला असता मात्र आता तसे होणार नसून सबंधीत शंभर टक्के नुकसान होणार असल्याचे निश्चित आहे .सदरील नुकसानग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देवून दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.