ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि जोरदार घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक Pudhari
हिंगोली

Shiv Sena Protest | सरसकट कर्जमाफीसाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चा; सेनगाव तहसील कार्यालयावर धडक

ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि जोरदार घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena Agitation Sengaon Tehsil Office

सेनगाव : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व प्रलंबित पीक विमा मिळावा, या मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. १६) सेनगाव येथे ट्रॅक्टर व बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सकाळी नगरपंचायत कार्यालयासमोरून मोर्चाला सुरुवात झाली. ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि जोरदार घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी राज्य सरकारच्या कर्जमाफी धोरणावर टीका करत शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

मोर्चात जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील, दिलीपराव घुगे, जिल्हा समन्वयक दिनकरराव देशमुख, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण देशमुख, गणेश शिंदे, तालुकाप्रमुख संतोष देवकर, नगराध्यक्ष वैभव देशमुख, शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, अमर देशमुख, करण देशमुख, स्वप्निल देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. तसेच प्रलंबित पीक विमा रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.

सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष न दिल्यास शिवसेना आपल्या आक्रमक शैलीत आंदोलन अधिक तीव्र करेल, असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT