Deadbody Found Pudhari
हिंगोली

Hingoli Crime | सेनगाव तालुक्यात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

उमरदरी शिवारातील फाट्याजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Sengaon youth dead body found

सेनगाव : तालुक्यातील उमरदरी शिवारातील फाट्याजवळ बुधवारी (दि. ८ ) सकाळी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार घातपाताचा असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे २५ वर्षे वयोगटातील या तरुणाचा मृतदेह उमरदरी परिसरातील शेतशिवारात आढळला. मृताच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट (पुमा कंपनीचे) आणि निळसर रंगाची नाईट लोअर होती. त्याच्या उजव्या हातावर ‘सचिता’ असे नाव व पावलाचे चिन्ह असलेला टॅटू असून, दुसऱ्या हातावर ‘मॉम-डॅड’ तसेच आई-वडील लहान मुलाचा हात धरलेले चित्र असलेला टॅटू आढळून आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जिल्हा पोलीस अधीक्षक निलाभ रोहन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या.

मृताची अद्याप ओळख पटलेली नसून, ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत मृतदेह हिंगोली येथील शासकीय शवगृहात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलीस पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे.

दरम्यान, वरील वर्णनाशी जुळणारा तरुण कोणाच्या ओळखीचा असल्यास तात्काळ सेनगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT