Republican Sena Protest pudhari photo
हिंगोली

Republican Sena Protest : रिपब्लिकन सेनेचे आसूड आंदोलन

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : गायरानधारकांच्या जमिनी नियमानुकूल करून त्यांच्या नावे सातबारा उतारे द्यावेत, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आसूड आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांना निवेदन देण्यात आले. गायरानधारकांच्या जमिनी नियमानुकूल करणे, सातबरावरील ‌‘पोटखराब‌’ नोंदी वगळावी, पात्र लाभार्थ्यांना फार्मर आयडी देणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे, अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. सर्व संबंधित प्रस्ताव उपविभागीय स्तरावर दाखल करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

या आंदोलनात कैलास जोंधळे, प्रा. बाळासाहेब पाईकराव, केशव कदम, नितीन रसाळ, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, दीपक धांडे , उत्तम चव्हाण, अनिल राठोड,यांच्यासह मरसुळ, पळसगाव, असोला, वाकोडी, बेलथर, टेंभुर्णी, मुरुंबा, माळवटा, डोंगरगाव, तरोडा, साळवा, चौंडी, बोरगाव व वडहिवरा येथील शेकडो गायरानधारक सहभागी झाले होेते. गायरानधारकांना जमिनीचा हक्क आणि शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळेपर्यंत रिपब्लिकन सेनेचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT