Accident Pudhari
हिंगोली

Hingoli Accident : हिंगोली-नांदेड रस्त्यावरील अपघातात मोटरसायकलस्वार ठार

ग्रीनपार्क जवळील घटना, परिसरात काही काळ वाहतूक कोंडी

पुढारी वृत्तसेवा

कळमनुरी : शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचारच्या सुमारास तीनचाकी (मिनीडोर) आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल क्र.(एमएच ३७ एए ४२३७) आणि तीनचाकी (क्र.एमएच २६ एडी ९४५३) यांची ग्रीनपार्कजवळ समोरासमोर धडक झाली. धडकेत मोटारसायकलवरील मंजुळ गंगाराम मंडळकर (वय ४०, रा. वाशिम) हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच फौजदार मदन गव्हाणे, कैलास गुंजकर , लक्ष्मीकांत माखणे विलास बांगर या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मंडळकर यांना तातडीने कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे हिंगोली-नांदेड मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया कळमनुरी पोलिसांकडून सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT