औंढा नागनाथः औंढा नागनाथ नगरपंचायत अंतर्गत अनेक कामे प्रलंबित आहेत. तसेच प्रभारी असलेले मुख्य नगराधिकारी दरक यांच्या कार्यपद्धतीला अनेक नगरसेवक कंटाळले आहेत. यातूनच नगराधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी नगरसेवकांनी आज दिनांक 28/11/2024 रोजी त्यांच्या खुर्चीलाच चपलेचा हार घातला.
मुख्य नगराधिकारी यांनी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी आचारसंहितेच्या काळात एका वाईन शॉपला नगरसेवकांचा ठराव संमत नसताना एनओसी देऊन परवानगी दिली. या विषयाला विरोध असतानाही मुख्य नगराधिकारी यांनी कुठल्याही नगरसेवकाला, नगराध्यक्षांना विश्वासात न घेता सदर एन ओ सी दिली. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी खुर्चीला चपलांचा हार घालून व त्यांच्या केबिनला कुलूप लावून निषेध व्यक्त केला. दरम्यान गावातील घरकुलांचे व विकास कामांचे देयके बाकी असताना व अनेक प्रकरणे प्रलंबित असताना सदर वाईन शॉप ला परवानगी दिली ही परवानगी कुठल्या आधारे दिली हे गुलदस्त्यात आहे. मात्र या परवाणगीमुळे आचारसंहितेचा भंग झाला असून यावर वरिष्ठ काय निकाल देतात हे पाहणे उस्तुकतेचे झाले आहे.
दरम्यान गावातील सामान्य नागरिकांत कचरा व्यवस्थापन, गावातील सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन व स्वच्छता याकडे लक्ष न देता सदर मुख्य नगराधिकारी यांनी या वाईन शॉप ला एनओसी देऊन काय साध्य केले. अशी चर्चा होत आहे. या आंदोलनावेळी नगराध्यक्ष सपना प्रदीप कनकुटे व उपनगराध्यक्ष अनिल देव तसेच माजी नगराध्यक्ष कपिल खंदारे उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख, दिलीप कुमार राठोड, राहुल धन, तलवार मनोज, अनिल देशमुख, जया देशमुख, शितल पवार यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.