हिंगोली

हिंगोली : नालेगावमध्ये माकडांचा उच्छाद; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

backup backup

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार परिसरातील नालेगाव येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून वनविभाग व महसूल विभागांना निवेदन देऊन वानर व माकड आणि वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे प्रशासनास लेखी निवेदन देण्यात आले. बंदोबस्त न केल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

आज (दि. २१) नालेगाव गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी वनविभाग कार्यालय व तहसील कार्यालय औंढा नागनाथ येथे लेखी निवेदन देण्यात आले. गावात जवळपास ४०० ते ४५० वानर व ४ माकड गावात आले आहेत. हे वानर घरात घुसून स्वयंपाक करत असताना महिलेस मारहाण तर शाळेत जाणाऱ्या मुलाचा व मुलीच्या अंगावर धावून येऊन जखमी करत आहेत तर गावातील रस्त्यावर चालणाऱ्या लहान मुलास, महिला, वयस्कर मंडळीस मारहाण करीत आहेत. अंगावर धावत येत हातातील सामान हिसकाऊन घेतात, घरावरील पत्रे, पाण्याची टाकी अदि विविध ठिकाणी धुमाकुळ घालून मोठ्याप्रमाणात नुकसान करीत आहेत. यामुळे रस्त्यावर चालताना व गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. त्यामुळे तात्काळ वनविभागाकडून या माकडांसह अन्य वन्य प्राण्यांचा १० दिवसात बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा उपोषण करु असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. सध्या गणेशोत्सव व ज्येष्ठ गौरी सण व खरीप हंगामातील पिक जोमदार असल्याने तात्काळ वनविभाग कडून दखल घेणे गरजेचे आहे अशी विनंती देखील ग्रामस्थांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT