औंढा नागनाथ : तालुक्यातील जवळा बाजार येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून गत सात महिन्यांपासून घरी बोलावून जबरीने शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी 2 डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारी वरून उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी गुन्हा भेट देऊन आरोपी सखाराम कीर्तने राहणार जवळा बाजार यांच्या विरोधात पॉक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक जी एस राहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उप निरीक्षक माधव जिव्हारे करीत आहेत.