Kalmanuri Gambling Den Raid Pudhari
हिंगोली

Hingoli Gambling Raid | ‘झन्ना-मन्ना’ जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड: चार जण ताब्यात; २.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Kalmanuri Gambling Den Raid

कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एका आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ५४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वाकोडी येथील कॅनलजवळ पत्त्यांवर पैसे लावून ‘झन्ना-मन्ना’ नावाचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयूर विजयकुमार रसाळ यांनी पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी जुगार खेळत असलेल्या सुनील मारोती वानखेडे, बालाजी काशीराम आसोले, विठ्ठल नथ्थुजी काकडे आणि राजेश बाबुराव शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले. तर आकाश कैलास बोके हा आरोपी फरार झाला.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT