Accident  Pudhari
हिंगोली

Hingoli Accident | कळमनुरी ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, एक गंभीर जखमी

अपघातग्रस्त ट्रॅक्टर विनानंबरचा, गंभीर जखमीला नांदेडला हलवले

पुढारी वृत्तसेवा

कळमनुरी: कळमनुरी ते ढोलक्याची वाडी या रस्त्यावर इंदिरानगर जवळ 28 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान विना क्रमांकाचे ट्रॅक्टर कळमनुरीहुन ढोलक्याचीवाडी येथे जाणाऱ्या ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच 38 एसी 4709 या दुचाकी ला धडक दिली या धडकेत दुचाकी वरील विशाल रामराव गुहाडे व ज्ञानेश्वर गुहाडे रा. ढोलक्याची वाडी हे दोघे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, जमादार संजय राठोड गुलाब जाधव दत्ता दहातोंडे हे घटनास्थळी जाऊन जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या जखमेवर डॉक्टर संजय माहुरे यांनी उपचार केले यातील गंभीर जखमी असलेल्या विशाल गुहाडे यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. तर किरकोळ जखमी असलेल्या ज्ञानेश्वर गुहाडे यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथे पाठविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अपघातातील ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात लावण्यात आले. ट्रॅक्टर चालक फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT