हिंगोली

हिंगोली : सकल मराठा समाजाचे पुरजळ सर्कलमध्ये उपोषण सुरु

स्वालिया न. शिकलगार

जवळाबाजार : पुढारी वृत्तसेवा – सकल मराठा समाज पुरजळ सर्कलमध्ये रोज एक गाव  बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करत आहे. आज दिनांक २७ ऑक्टोबरपासून परभणी हिंगोली मार्गावर जवळाबाजारपासून जवळच आसोला पाटी पेट्रोल पंप जवळ बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.

रोज सकाळी ९ वाजता ते दुसरा दिवशी सकाळी ९ पर्यंत दररोज एक गाव सहभाग घेणार आहेत. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी पुरजळ सर्कल मध्ये सकाळी ९ वाजता साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहेत. २७ ऑक्टोबर आसोला ढोबळे,  २८ ऑक्टोबर रोजी रांजाळा, २९ ऑक्टोबर टाकळ गव्हाण, ३० ऑक्टोबर वडद, ३१ ऑक्टोबर पोटा खुर्द ( शेळके), १ नोव्हेंबरला नालेगाव, २ नोव्हेंबर पुरजळ आदी गावे या बेमुदत साखळी उपोषणात सहभाग घेणार आहेत.

हिंगोली-जवळाबाजार

उपोषणाचे लेखी निवेदन तहसीलदार औंढानागनाथ व पोलीस चौकी जवळाबाजार येथे देण्यात आले आहेत. तेव्हा या बेमुदत साखळी उपोषणास मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाने सहभाग व्हावा घ्यावा असे आवाहन पुरजळ सर्कल मधील सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

मराठा समाज आरक्षण आज उपोषण तिसरा दिवस 

बसस्थानक परिसरात परभणी हिंगोली मार्गावर सकल मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे, यासाठी विकास गायकवाड उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सकल मराठा समाज आरक्षण देण्यात यावे. दिनांक २५ ऑक्टोबरपासून येथील बसस्थानक परिसरात सकल मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे. यासाठी विकास गायकवाड उपोषणास बसले असून रोज मोठ्या प्रमाणात नागरिक भेट घेऊन पाठिंबा जाहीर करीत आहेत.

SCROLL FOR NEXT