तीन हजारांची लाच घेताना जमादार चतुर्भुज pudhari photo
हिंगोली

Hingoli bribe case : तीन हजारांची लाच घेताना जमादार चतुर्भुज

अदखलपात्र गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी घेतली लाच

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत कडोळी येथे अदखलपात्र गुन्ह्यात जामीन मिळवून देतो तसेच विरोधी गटावर कारवाई करण्यासाठी तीन हजाराची लाच घेतांना गोरेगाव पोलिस ठाण्याच्या जमादारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी गोरेगाव ते खांबाळा चौफुली येथे रंगेहात पकडले.

गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत कडोळी येथे भावकीच्या दोन गटात वाद झाला होता. याप्रकरणात तक्रारदारावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास जमादार राहुल मैंदकर याच्याकडे होता. तपासामध्ये जामीन मिळवून देण्यासाठी तसेच विरुध्द गटावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी जमादार मैदकर याने चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर यामध्ये तडजोड होऊन तीन हजार रुपये देण्याचे ठरले होते.

या प्रकरणात तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. यावरून लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार राजाराम फुपाटे, गजानन पवार, विनोद पुंडगे, शिवाजी वाघ, शेख अकबर, भगवान मंडलिक यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी गोरेगाव पासून काही अंतरावर असलेल्या गोरेगाव ते खांबाळा चौफुली येथे सापळा रचला होता.

दरम्यान, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मैंदकर याने तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्विकारताच लाचलुचपतच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT