Hingoli Firefighter Death
हिंगोली : हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्री झालेल्या भीषण फटाका अग्निकांडात बुधवारी (दि.७) मध्यरात्री तिसरा बळी गेला. या दुर्घटनेत जखमी झालेले हिंगोली नगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचारी दिलीप दौडके यांचा लातूर येथे उपचारादरम्यान रात्री १.३० वाजता दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे फटाका अग्निकांडातील मृतांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. मृतांमध्ये हिंगोली नगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
रहिवासी वस्तीत फटाक्यांचा साठा ठेवला जात असताना संबंधित यंत्रणांकडून वेळीच तपासणी झाली होती का, असा गंभीर प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून फटाक्यांचा साठा, परवाना आणि साठवणुकीच्या ठिकाणाबाबतची संपूर्ण माहिती तपासावी, अशी मागणी होत आहे.
रहिवासी वस्तीत अवैधरीत्या फटाक्यांचा साठा ठेवण्यास कोण जबाबदार आहे, तसेच संबंधित विभागांकडून दुर्लक्ष झाले का, याची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.