औंढा नागनाथः औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा जेमतेम 1000 वस्तीचे गाव. या ठिकाणी वसंत चंद्र राठोड व कुटुंबीयांच साधारण घर आहे .शेतातील कामे करण्यासाठी व वसंतासह कुटुंबीय शेतात काम करण्यासाठी गेल्यावर दुपारी बारा ते एकच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली. यामध्ये एका कामासाठी घरात आणून ठेवलेली 5 लाखांची रोखड जळून खाक झाली.
या आगीत घरातील सर्व जीवन उपयोगी वस्तू ,साहित्य ,भांडेकुंडे, अंथरून पांघरून कपडेलते जळून गेले. घरामध्ये नुकतीच पाच लाख रुपये रोकड आणून ठेवली होती, त्या रोकड मधून बहुतांश रोकड जळाल्याची दिसून येत असून वसंता राठोड याचे कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
याबाबत शासनाकडून मदत मिळण्यासाठी तक्रार दाखल करणार असून आतापर्यंत या घटनेबाबत पोलिसात किंवा महसूल प्रशासनात कुठलीही नोंद झालेली नाही. पण या प्रकारामुळे काठोडा तांडा गावात या प्रकारामुळे शोककळा पसरली असून राठोड कुटुंबीय मात्र उघड्यावर पडले आहे.