शिरड शहापूर, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे आज (दि.१) ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावर्षी ईद-ए-मिलादुन्नबी आणि गणपती विसर्जन एकाच दिवशी आल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातच ईद-ए-मिलादुन्नबीचे कार्यक्रम एक किंवा दोन दिवस पुढे घेण्यात आले.
शिरड शहापूर येथील मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा ठेवत २८ सप्टेंबररोजी गणपती विसर्जन असल्यामुळे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणूक आज काढण्यात आली. यावेळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. हजरत मोहम्मद पैगंबर यांनी सांगितल्याप्रमाणे शांततेचा व समानतेचा संदेश देण्यात आला. मिरवणुकीत जागोजागी मिठाई, पाणी वाटप करण्यात आले. मिरवणूक संपल्यानंतर फातेह खानी कार्यक्रम व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत लहान मुलांसह मुस्लिम बांधव उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान, कुरुंदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे फौजदार श्रीधर वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा