वसमत : तालुक्यातील चोंडी फाटा येथे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. दररोजच्या दिनचर्याप्रमाणे बँकेतील कर्मचारी हा रोज वसमत येथील मुख्य शाखेतून काही रक्कम रोज सकाळी चोंडी शाखेतील बँकेमध्ये घेऊन येत असतो. त्या दिनचर्याप्रमाणे ज्ञानेश्वर उर्फ बंडू भोसले हा कर्मचारी आज सकाळी दहा वाजता वसमत शाखेतून काही रोख रक्कम घेऊन निघाला असता, वाटेमध्ये कोर्टापाटी ते पांगरापाटी दरम्यान दरोडेखोरांनी त्या कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला फोर व्हीलरने धक्का दिला.
कर्मचाऱ्याजवळ असलेली आठ लाख रुपये रोख रक्कम एका बॅगेमध्ये भरलेली बॅग अपघाताचा बनाव करत लंपास केली. यामध्ये बँक कर्मचारी ज्ञानोबा भोसले हा जखमी झाला असून त्याच्यावर वसमत येथे उपचार चालू आहेत तर दरोडेखोरांनी पैशाची बॅग घेऊन दुचाकीवरून पसार झाले.
ही माहिती परिसरामध्ये वाऱ्यासारखी वेगाने पसरली. तात्काळ घटनास्थळी कुरुंदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामदास निरदोडे यांनी भेट देऊन लुटारूंचा मागावा घेतला असता, आरोपी हे पांगरा बोखारे पारवा या मार्गे गेल्याची माहिती गुप्त माहिती दाराकडून कळाली व आरोपीचा शोध घेण्यासाठी सगळीकडे नाकाबंदी लावण्यात आली. यामध्ये दोन संशयित आरोपी कुरुंदा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.