आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील तोंडापुर शिवारात असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ सुरू असलेल्या यात्रेत जुगार अड्ड्यावर आखाडा बाळापूर पोलिसांनी बुधवारी (दि. २१ जानेवारी) सायंकाळी ५.४५ वाजता छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ६३ हजार ३३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी यात्रेत पैशांवर झना मना नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विष्णुकात गुठे यांच्या पथकाने छापा टाकला. तर ठिकठिकाणी जुगार खेळत असल्याचे दिसले असता पोलिसांनी जुगार खेळताना पकडले. या दरम्यान पोलीस आले समजतात जुगारी पोलिसांना पाहून पळ काढला व काहीना पोलिसांनी ताब्यात घेतले. या छाप्यात रोख रक्कम तसेच विविध कंपन्यांचे अँड्रॉईड मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये तोंडापुर,कुर्तडी. गिरगाव व लिंबाळा परिसरातील रहिवाशांचा समावेश आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, हिंगोली व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठे ,पोलीस उपनिरीक्षणक गणेश गोटके, शिवाजी पवार, व पोलीस पथकांनी कारवाई केली.