हिंगोली

हिंगोली : मतदानावरचा बहिष्कार मागे, पण आम्हाला धान्य वेळेवर मिळावे हीच विनंती; राजापूर ग्रामस्थांची मागणी

backup backup

नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील राजापूर येथील काही लाभार्थ्यांनी धान्य वेळेवर मिळत नसल्यामुळे तहसील कार्यालय औंढा नागनाथ येथे तक्रार केली होती. मार्च महिन्याचे धान्य वेळेवर मिळाले नाही म्हणून दुकानदारावर गुन्हा दाखल करावा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला होता. मात्र आज या सर्वांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेत आम्हाला वेळेत धान्य मिळावं अशी मागणी केली आहे.

तहसीलदार औंढा नागनाथ यांनी तातडीने दखल घेऊन चौकशी करण्यासाठी चौकशी करण्यासाठी आदेश दिले. या आदेशावरुन अर्जदार व लाभार्थी यांनी जाखमोक्यावर जाऊन चौकशी केली, असता काही पात्र लाभार्थी यांना धान्य वितरण करण्यात आले असे तक्रार करणारे गायकवाड यांनी सांगितले व आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेला नाही व तसे कृत्यं आम्ही कधीच करणार नाही असे सांगितले, आम्हाला फक्त धान्य वेळेवर हवे होते मतदानावर बहिष्कार वृत्त खोटे आहे.

संबंधित लाभार्थी यांना चौकशी करण्यापुर्वी रास्त भाव दुकानदार पोले यांनी धान्य वितरण केले. चौकशी वेळी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव ,अव्वल कारकून इम्रान पठाण,आपरेटर दिपके, पोलीस पाटील श्रीमती पोले, अर्जदार गायकवाड,चंपतराव पोले, हनुमंत पोले, नरसिंह चिरमाडे,सखाराम चिरमाडे गावकरी, सरस्वती पोले,लाभार्थी, तक्रारदार तसेच वंचित लाभार्थी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT